
दौंडच्या राजकारणात नवा ‘तुषार’ गोपाळवाडी–कानगाव गटात “तुषार” चर्चेच्या केंद्रस्थानी…
पुणेरी टाइम्स टीम…दौंड तालुक्यातील राजकारणात सध्या नव्या नेतृत्वाची चर्चा जोर धरू लागली असून, गोपाळवाडी–कानगाव जिल्हा परिषद गटातून तुषार सोनवणे हे नाव वेगाने पुढे येत आहे. शिवसेनेचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळख असलेले तुषार सोनवणे कोणता झेंडा हाती घेणार, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी त्यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या











