दौंड : दौंड येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन ॲड. माधव अवचर यांच्या हस्ते करण्यात आले. पत्रकार दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात पत्रकारांच्या सामाजिक जबाबदारीवर आणि लोकशाहीतील माध्यमांच्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला.
या प्रसंगी दौंड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र जगताप, साप्ताहिक पुष्कराजचे संपादक राजू जगदाळे, पुणेरी टाइम्सचे संपादक निलेश जांबले, उमेश जगदाळे, सुप्रिया अवचर, पत्रकार पवन साळवे, राजेंद्र शितोळे यांच्यासह अनेक पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत पत्रकारांनी सत्य, निर्भीड आणि समाजहिताचे पत्रकारितेचे कार्य अधिक जोमाने करावे, असे आवाहन एडवोकेट माधव सर नोटरी भारत सरकार यांनी केले. एकत्रित संवादातून पत्रकारांच्या समस्या, अपेक्षा आणि भविष्यातील दिशा यावरही सकारात्मक चर्चा झाली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



