पुणेरी टाइम्स टीम… नगरपालिका निवडणुकीच्या निकालातून दौंडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असल्याचे दिसून आले आहे. हा आमदार ‘राहुल कुल’ यांना राजकीय धक्का असल्याचे बोलले जात आहे.दौंड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या दुर्गादेवी जगदाळे यांचा ५,१९४ मतांनी दणदणीत विजय झाला आहे. तदनंतर दौडमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जात आहे.
दौंड शहरात राष्ट्रवादी (अजित पवार गट) ची ताकद वाढली, आगामी निवडणुकीत कुल यांची डोकेदुखी वाढणार? असल्याचे बोलले जात आहे.
दौंड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना मोठे यश मिळाले असून, दुर्गादेवी जगदाळे यांनी तब्बल ५,१९४ मतांच्या फरकाने विजय मिळवत नगराध्यक्षपदावर कब्जा केला आहे. या निकालामुळे दौंडच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, भाजपचे आमदार राहुल कुल यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
या निवडणुकीत केवळ नगराध्यक्षपदासह अजित पवार गटाचे अनेक नगरसेवक निवडून आले आहेत. तर भाजपा पुरस्कृत ‘नागरी हित संरक्षण मंडळ’ अनेक नगरसेवकांनी बाजी मारलेली आहे. आत्ता दौंड नगरपालिकेतील सत्तासमीकरणे बदलली आहेत. विशेषतः शहरी भागात अजित पवार यांची आणि राष्ट्रवादीची राजकीय ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
शहरात अजित पवार गटाचा प्रभाव वाढतोय… असे चित्र स्पष्ट झाले आहे. दौंड शहरामध्ये गेल्या काही वर्षांत भाजपची पकड मजबूत मानली जात होती. मात्र या निकालाने शहरातील मतदारांचा कल बदलत असल्याचे संकेत दिले आहेत. अजित पवार गटाने स्थानिक नेतृत्व, संघटनबांधणी आणि नगरसेवकांच्या माध्यमातून शहरात प्रभावी मोर्चेबांधणी केली, त्याचा थेट फायदा या निवडणुकीत झाल्याचे राजकीय जाणकार सांगतात.आमदार राहुल कुल यांच्यासाठी आव्हानांची घंटा असल्याचे बोलले जात आहे. या निकालानंतर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार राहुल कुल यांची राजकीय डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शहरातील सत्ता गमावल्याने ग्रामीण-शहरी मतांचे संतुलन राखणे कुल यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. विशेषतः, नगरपालिका, नगरसेवक आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा प्रभाव नेहमी विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरतो, हे लक्षात घेता हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.
राष्ट्रवादीसाठी आत्मविश्वास, भाजपसाठी आत्मपरीक्षणाची वेळ…दुर्गादेवी जगदाळे यांच्या विजयामुळे अजित पवार गटामध्ये आत्मविश्वास संचारला असून, दौंड हा आपला बालेकिल्ला करण्याच्या दिशेने पावले टाकली जात आहेत. दुसरीकडे भाजप व आमदार कुल गटासाठी संघटनात्मक फेरबांधणी आणि रणनीती बदलण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
दौंडच्या राजकारणात नवे पर्व? एकूणच, दौंड नगरपालिकेचा हा निकाल केवळ स्थानिक सत्तेपुरता मर्यादित नसून, तो आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचा ‘सेमीफायनल’ मानला जात आहे. अजित पवार यांची वाढती ताकद आणि शहरी भागातील राष्ट्रवादीचा विस्तार पाहता, दौंडचे राजकारण आता अधिक चुरशीचे होणार हे निश्चित आहे.



