Breaking News
दौंड पंचायत समितीचे सभापती ‘सुखदेव चोरमले’ ॲक्शन मोडवर; मनरेगा यंत्रणा सुतासारखी सरळ – रखडलेली कामं मार्गी लागणार! दौंड पंचायत समितीचे सभापती “सुखदेव चोरमले” ॲक्शन मोडवर! रोजगार हमी कक्षातील कामांचा धडाकेबाज आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या कडक सूचना… शिवरायांचा अवमान पडला महागात! CET सेलने मानली चूक, कारवाई अटळ- आमदार ‘राहुल कुल’ यांची माहिती… पुणे जिल्हा परिषद “अध्यक्षांच्या तालुक्यातच मनरेगाचा बोजवारा; शेतकऱ्यांची उघड पिळवणूक!” बदली म्हणजे पळवाट? भ्रष्ट अधिकारी सुरक्षित, शेतकरी उद्ध्वस्त! दोन वर्षे पैसे नाहीत, फाईल गायब – दौंड पंचायत समिती प्रशासनाचा काळा कारभार उघड! युवा पत्रकार “अक्षय देवडे” यांना ग्रामीण पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान…

शिवरायांचा अवमान पडला महागात! CET सेलने मानली चूक, कारवाई अटळ- आमदार ‘राहुल कुल’ यांची माहिती…

SHARE:

Puneri Time’s – एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून सीईटी सेलकडून शिवरायांचा अपमान झाल्याची गंभीर बाब आमदार राहुल कुल यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्या निदर्शनास आणून दिली होती. सिटी सेलने याची गंभीर दखल घेतली असून, झालेल्या चुकीबाबत दिलगिरी व्यक्त करत माफीनामा सादर केला असल्याची माहिती दौंड आमदार राहुल कुल यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १ व २ एप्रिल २०२६ रोजी ३ वर्षीय एलएलबी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीने एकूण ४ सत्रांमध्ये घेण्यात आली. या सर्व सत्रांसाठी वापरण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी भाषेसोबत अनुवादित मराठी भाषेमधील आवृत्ती पुरविण्यात आलेली होती. त्यापैकी एका सत्रासाठी वापरण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेमधील सामान्यज्ञान विभागाच्या मराठी अनुवादित आवृत्तीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळाचे नाव काय होते, अशा आशयाच्या प्रश्नामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख झाल्याचे निदर्शनास आलेले असल्यामुळे संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशा प्रकारची मागणी आमदार राहुल कुल यांनी केली होती.

याबाबत राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्याकडून आमदार राहुल कुल यांना पाठवलेल्या पत्रात राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांचे गोपनीय कामकाज तज्ज्ञांमार्फत करून घेतले जाते. गोपनीयता राखण्याच्या दृष्टीने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामधील कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी या सर्व गोपनीय कामकाजामध्ये प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागी नसतो. या सर्व प्रक्रियेची सर्वोच्च पातळीची गोपनीयता राखण्याच्या दृष्टीने या प्रक्रियेमध्ये राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचा सहभाग हा फक्त सर्व तज्ञांना गोपनीय कामकाजासाठी आवश्यक असलेली यंत्रणा उपलब्ध करून देणे या पुरता मर्यादित ठेवण्यात आलेला आहे. प्रश्न तयार करताना अथवा अनुवादित आवृत्तीचे परीक्षण करताना संबंधित तज्ञांकडून अनवधानाने ही चूक झाल्याची शक्यता असावी. तथापि, या चुकीचे समर्थन न करता, झालेल्या चुकीबद्दल सीईटी कक्ष दिलगिरी व्यक्त करीत आहे व माफीनामा सादर करीत आहे व ज्यांचेकडून चूक झाली त्यांचेवर देखील कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे.

याबाबत आमदार राहुल कुल यांनी समाधान व्यक्त केले असून संबंधितांनी तत्काळ कार्यवाही केल्याबद्दल आभार मानले आहेत.

Puneri Times
Author: Puneri Times

Leave a Comment

वाचनीय बातम्या