पुणेरी टाइम्स टीम…दौंड तालुक्यातील राजकारणात सध्या नव्या नेतृत्वाची चर्चा जोर धरू लागली असून, गोपाळवाडी–कानगाव जिल्हा परिषद गटातून तुषार सोनवणे हे नाव वेगाने पुढे येत आहे. शिवसेनेचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळख असलेले तुषार सोनवणे कोणता झेंडा हाती घेणार, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी त्यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
गोपाळवाडी–कानगाव हा गट दौंड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या गटात आतापर्यंत अनेक दिग्गजांनी आपली ताकद आजमावली आहे. मात्र, सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये तुषार सोनवणे हे नव्या दमाचे, तरुण आणि संघटनात्मक अनुभव असलेले नेतृत्व म्हणून पुढे येत असल्याचे चित्र आहे.
शिवसेनेच्या कार्यातून घडलेले, तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क, स्थानिक प्रश्नांवरील स्पष्ट भूमिका आणि सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग यामुळे तुषार सोनवणे यांना तरुणांसह मतदारांचा देखील पाठिंबा मिळताना दिसतो. त्यामुळे गोपाळवाडी–कानगाव जिल्हा परिषद गटासाठी ते एक मजबूत इच्छुक उमेदवार म्हणून पाहिले जात आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, सध्या दौंड तालुक्यातील राजकारणात पक्षीय समीकरणे झपाट्याने बदलणार असून अनेक इच्छुक नव्या राजकीय संधींच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत तुषार सोनवणे शिवसेनेतच राहणार की नव्या राजकीय वाटेवर जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यांच्या निर्णयावर या गटातील राजकीय गणिते बदलण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
एकूणच गोपाळवाडी–कानगाव जिल्हा परिषद गटात तुषार सोनवणे यांच्या राजकीय उदयाने नव्या चर्चांना उधाण आले असून, आगामी काळात त्यांचा निर्णय दौंड तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरेल यांत शंका नाहीं. त्यामुळे दौंडच्या राजकारणात नवा ‘तुषार’ हे निश्चित आहे.


