Breaking News
दौंड पंचायत समितीचे सभापती ‘सुखदेव चोरमले’ ॲक्शन मोडवर; मनरेगा यंत्रणा सुतासारखी सरळ – रखडलेली कामं मार्गी लागणार! दौंड पंचायत समितीचे सभापती “सुखदेव चोरमले” ॲक्शन मोडवर! रोजगार हमी कक्षातील कामांचा धडाकेबाज आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या कडक सूचना… शिवरायांचा अवमान पडला महागात! CET सेलने मानली चूक, कारवाई अटळ- आमदार ‘राहुल कुल’ यांची माहिती… पुणे जिल्हा परिषद “अध्यक्षांच्या तालुक्यातच मनरेगाचा बोजवारा; शेतकऱ्यांची उघड पिळवणूक!” बदली म्हणजे पळवाट? भ्रष्ट अधिकारी सुरक्षित, शेतकरी उद्ध्वस्त! दोन वर्षे पैसे नाहीत, फाईल गायब – दौंड पंचायत समिती प्रशासनाचा काळा कारभार उघड! युवा पत्रकार “अक्षय देवडे” यांना ग्रामीण पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान…

दौंडमध्ये “अजय राऊत” यांच्या नावाची जोरदार हवा — युवकांचा सोशल मीडियावर ट्रेंड

SHARE:

पुणेरी टाइम्स टीम (दौंड)- दौंड शहरात सध्या एकच नाव सर्वत्र गाजत आहे — अजय राऊत. सोशल मीडियावर त्यांच्या पोस्ट्स, रील्स आणि स्टेटसचा जबरदस्त ट्रेंड सुरू असून, विशेषतः युवकांमध्ये त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढताना दिसतेय.

“नगरसेवक — आम्ही पैशाने कमी असू पण सदैव जनतेत दिसू..!” या टॅगलाईनसह अजय राऊत यांचा फोटो असलेली पोस्ट सध्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप स्टेटसवर जोरदार व्हायरल झाली आहे. स्थानिक तरुण “आपला माणूस… श्री. अजय बाळासाहेब राऊत” अशा शब्दांत त्यांना समर्थन देत आहेत.

अजय राऊत हे समाजकार्य, लोकसहभाग आणि जनतेशी सातत्याने जोडून राहण्याबद्दल ओळखले जातात. सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. त्यामुळे त्यांना दौंड शहरात तसेच आसपासच्या परिसरात मोठा जनाधार मिळत आहे.

युवकांच्या मनात अजय राऊत हे “नेतृत्वाचं नवं प्रतीक” म्हणून स्थान मिळवत असून, सोशल मीडियावरील त्यांच्या सक्रियतेमुळे त्यांचं व्यक्तिमत्व अधिक उजळून दिसत आहे.

दौंड शहरात सध्या “अजय राऊत” हे नाव सोशल मीडियापासून ते राजकीय चर्चांपर्यंत सर्वत्र झळकत असून, त्यांच्या कार्यशैलीमुळे स्थानिक राजकारणातही त्यांचं नाव चर्चेचा विषय ठरत आहे.

“आपला माणूस… श्री. अजय बाळासाहेब राऊत” हे नाव सध्या दौंडकरांच्या मनात घर करणारे नाव बनलय!

Puneri Times
Author: Puneri Times

Leave a Comment

वाचनीय बातम्या