पुणे (प्रतिनिधी) – सामाजिक कार्यात नेहमी आघाडीवर — युवकांमध्ये आनंदाचे वातावरण, सामाजिक मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या पुणे व सोलापूर जिल्हा विभागीय अध्यक्षपदी ‘शिवश्री सुनील (नाना) पासलकर’ यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. सामाजिक कार्य, विचारप्रबोधन आणि युवक संघटन क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सुनील पासलकर हे अनेक वर्षांपासून संभाजी ब्रिगेड या विचारप्रबोधनात्मक संघटनेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे, शिक्षण व स्वाभिमान या मूल्यांची जपणूक करण्याचे काम करत आहेत. सामाजिक न्याय, शिक्षण प्रसार, इतिहास जागृती आणि युवकांना संघटित करण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे.
त्यांच्या निवडीनंतर पुणे व सोलापूर जिल्ह्यातील परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी सोशल मीडियावरून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. संभाजी ब्रिगेडच्या विविध पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “पासलकर” यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्याला नवे बळ आणि दिशा मिळेल.या निमित्ताने सर्व मित्र परिवार तर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, भविष्यातील सामाजिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
— पुणेरी टाइम्स प्रतिनिधी, पुणे



