Breaking News
दौंड पंचायत समितीचे सभापती ‘सुखदेव चोरमले’ ॲक्शन मोडवर; मनरेगा यंत्रणा सुतासारखी सरळ – रखडलेली कामं मार्गी लागणार! दौंड पंचायत समितीचे सभापती “सुखदेव चोरमले” ॲक्शन मोडवर! रोजगार हमी कक्षातील कामांचा धडाकेबाज आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या कडक सूचना… शिवरायांचा अवमान पडला महागात! CET सेलने मानली चूक, कारवाई अटळ- आमदार ‘राहुल कुल’ यांची माहिती… पुणे जिल्हा परिषद “अध्यक्षांच्या तालुक्यातच मनरेगाचा बोजवारा; शेतकऱ्यांची उघड पिळवणूक!” बदली म्हणजे पळवाट? भ्रष्ट अधिकारी सुरक्षित, शेतकरी उद्ध्वस्त! दोन वर्षे पैसे नाहीत, फाईल गायब – दौंड पंचायत समिती प्रशासनाचा काळा कारभार उघड! युवा पत्रकार “अक्षय देवडे” यांना ग्रामीण पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान…

आत्मविश्वास वाढविणारी ‘भाषणकला कार्यशाळा’ दौंड येथे — नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वाचा सविस्तर…

SHARE:

पुणेरी टाइम्स टीम (दौंड)- प्रभावी वक्तृत्वकला आणि आत्मविश्वासपूर्ण संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी ‘भाषणकला कार्यशाळा’ (Public Speaking Workshop) या तीन दिवसांच्या विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दौंड येथे करण्यात आले आहे. दिनांक 25, 26 व 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत ही कार्यशाळा पार पडणार असून, सुप्रसिद्ध वक्ते आणि व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक नितीन शिवाजी देसाई हे मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, युवा वर्गाला तसेच सर्वसामान्य नागरिकांना संवादकौशल्य आणि भाषणकलेच्या मूलभूत व प्रगत तंत्रांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्टेजफियरवर मात कशी करावी, आत्मविश्वासाने भाषण कसं करावं, प्रभावी भाषाशैली आणि शरीरबोलीचं महत्त्व, छोट्या भाषणांचं सादरीकरण कसं करावं यासह व्यावहारिक सराव यावर या सत्रांदरम्यान भर दिला जाणार आहे.

प्रशिक्षक नितीन देसाई हे अनुभवी वक्ते असून, त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था, युवक मंडळे आणि शासकीय प्रशिक्षण केंद्रांमधून व्यक्तिमत्त्व विकासावर प्रभावी प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक युवकांनी आत्मविश्वास वाढवून सार्वजनिक व्यासपीठावर स्वतःला सिद्ध केले आहे.

कार्यशाळेदरम्यान केवळ सैद्धांतिक नव्हे, तर प्रत्यक्ष भाषण, संवाद आणि खेळांच्या माध्यमातून शिकवण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे सहभागी व्यक्तींचा संवाद आत्मविश्वास, आवाजातील ठामपणा आणि श्रोत्यांशी संवाद साधण्याची क्षमता वाढेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

या उपक्रमासाठी नोंदणी सुरू झाली असून, इच्छुकांनी 9561963554 या क्रमांकावर संपर्क साधावा. मर्यादित जागा असल्याने लवकर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Puneri Times
Author: Puneri Times

Leave a Comment

वाचनीय बातम्या