Puneri Time’s Team – पुणे जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोणी–कंद–पेरणे जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, प्रदीप दादा कंद यांचा कट्टर समर्थक आणि पैलवान म्हणून ओळख असलेले किरण साकोरे यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या अधिकृत घोषणेपूर्वीच किरण साकोरे यांनी या गटातील राजकीय समीकरणे ढवळून काढली असून, त्यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, भव्य ‘काशी दिव्य काशी संकल्प यात्रे’च्या माध्यमातून किरण साकोरे यांनी आपली सामाजिक ताकद प्रत्यक्ष मैदानात उतरण्याआधीच दाखवून दिली आहे. आतापर्यंत चार रेल्वे गाड्या वैयक्तिक खर्चातून राखीव करून मतदारसंघातील महिला व नागरिकांना मोफत काशी विश्वनाथ आयोध्या दर्शन घडवण्यात आले आहे. या उपक्रमामुळे संपूर्ण मतदारसंघात किरण साकोरे यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली असून, सामाजिक आणि धार्मिक भावनांना हात घालत त्यांनी थेट जनसामान्यांशी नाळ जोडल्याचे चित्र आहे.
फुलगाव येथील युवा नेते असलेले किरण साकोरे हे फुलगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे पदाधिकारी तसेच फुलगावचे माजी सरपंच यांचे चिरंजीव आहेत. घरातूनच सामाजिक आणि सहकार क्षेत्राचे संस्कार लाभलेल्या किरण साकोरे यांनी आतापर्यंत गावपातळीवर मजबूत नेटवर्क उभे केले असून, त्याचा फायदा निवडणुकीत होणार यात शंका राहिली नाही. पैलवान किरण साकोरे विक्रमी मतांनी विजयी होतील असे राजकीय अंदाज वर्तवले जात आहेत.
प्रदीप दादा कंद यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या किरण साकोरे यांच्या उमेदवारीमुळे लोणी–कंद–पेरणे गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधकांमध्येही हालचाल सुरू झाली असून, या गटात यंदाची लढत केवळ पक्षीय नव्हे तर प्रतिष्ठेची आणि ताकदीची ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सामाजिक उपक्रम, धार्मिक यात्रांमधून मिळवलेला जनसंपर्क, सहकार क्षेत्रातील पकड आणि युवा नेतृत्वाचा चेहरा — या सगळ्या गोष्टींच्या जोरावर पैलवान किरण साकोरे पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठा गाजावाजा करतील, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.



