Breaking News
दौंड पंचायत समितीचे सभापती ‘सुखदेव चोरमले’ ॲक्शन मोडवर; मनरेगा यंत्रणा सुतासारखी सरळ – रखडलेली कामं मार्गी लागणार! दौंड पंचायत समितीचे सभापती “सुखदेव चोरमले” ॲक्शन मोडवर! रोजगार हमी कक्षातील कामांचा धडाकेबाज आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या कडक सूचना… शिवरायांचा अवमान पडला महागात! CET सेलने मानली चूक, कारवाई अटळ- आमदार ‘राहुल कुल’ यांची माहिती… पुणे जिल्हा परिषद “अध्यक्षांच्या तालुक्यातच मनरेगाचा बोजवारा; शेतकऱ्यांची उघड पिळवणूक!” बदली म्हणजे पळवाट? भ्रष्ट अधिकारी सुरक्षित, शेतकरी उद्ध्वस्त! दोन वर्षे पैसे नाहीत, फाईल गायब – दौंड पंचायत समिती प्रशासनाचा काळा कारभार उघड! युवा पत्रकार “अक्षय देवडे” यांना ग्रामीण पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान…

दौंड पंचायत समितीसाठी सौ. शुभांगी पासलकर यांना उमेदवारी द्यावी, पारगाव–पिंपळगाव गणमधील तरुण व महिला, ग्रामस्थ आग्रही…

SHARE:

पुणेरी टाइम्स टीम… दौंड तालुक्यातील पारगाव–पिंपळगाव गण क्रमांक ८७ मधून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पिंपळगाव येथील माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ. शुभांगी सुनील पासलकर यांना उमेदवारी मिळावी, अशी जोरदार मागणी महिला, तरुण वर्ग व ग्रामस्थांकडून होत आहे.

सौ. शुभांगी पासलकर यांनी गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामे यशस्वीपणे पूर्ण केली असून त्या एक अभ्यासू, शांत आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला व युवकांसाठीचे उपक्रम अशा अनेक विषयांवर त्यांनी प्रभावी कामगिरी बजावल्याने गावात त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

त्यांच्या पाठीशी असलेले मार्गदर्शक पती श्री. सुनील सुरेश पासलकर हे सुशिक्षित अभियंता असून संभाजी ब्रिगेडचे पुणे व सोलापूर विभागीय अध्यक्ष आहेत. तळागाळातील तरुण, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांशी त्यांचा घनिष्ठ संपर्क असल्यामुळे या निवडणुकीत त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे पासलकर परिवार हा आमदार राहुल कुल यांचा निष्ठावान परिवार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे राजकीय व सामाजिक पातळीवरही त्यांना मजबूत पाठबळ मिळण्याची शक्यता आहे.

पारगाव–पिंपळगाव गणामध्ये वारंवार ठराविकच लोकांना संधी दिली जाते, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे यावेळी जर सौ. शुभांगी पासलकर यांना उमेदवारी मिळाली, तर या गणामध्ये निर्णायक मतदान होऊन नवा इतिहास घडू शकतो, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून वर्तवला जात आहे.

तरुणांच्या आग्रहामुळे पंचायत समिती निवडणूक लढवण्याचा निर्णय जरी त्यांनी घेतलेला असला, तरी अंतिम निर्णय मार्गदर्शक नेतृत्वाशी चर्चा करूनच घेतला जाईल, असे एकूणच चित्र सध्या दिसून येत आहे.

Puneri Times
Author: Puneri Times

Leave a Comment

वाचनीय बातम्या