Breaking News
दौंड पंचायत समितीचे सभापती ‘सुखदेव चोरमले’ ॲक्शन मोडवर; मनरेगा यंत्रणा सुतासारखी सरळ – रखडलेली कामं मार्गी लागणार! दौंड पंचायत समितीचे सभापती “सुखदेव चोरमले” ॲक्शन मोडवर! रोजगार हमी कक्षातील कामांचा धडाकेबाज आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या कडक सूचना… शिवरायांचा अवमान पडला महागात! CET सेलने मानली चूक, कारवाई अटळ- आमदार ‘राहुल कुल’ यांची माहिती… पुणे जिल्हा परिषद “अध्यक्षांच्या तालुक्यातच मनरेगाचा बोजवारा; शेतकऱ्यांची उघड पिळवणूक!” बदली म्हणजे पळवाट? भ्रष्ट अधिकारी सुरक्षित, शेतकरी उद्ध्वस्त! दोन वर्षे पैसे नाहीत, फाईल गायब – दौंड पंचायत समिती प्रशासनाचा काळा कारभार उघड! युवा पत्रकार “अक्षय देवडे” यांना ग्रामीण पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान…

“तुषार थोरात यांच्या नेतृत्वात दौंडच्या राजकारणात खरोखरच नवा अध्याय सुरू, दौंडच्या राजकारणात नवा खेळाडू उदयास? — तुषार थोरात यांच्या पुढाकारामुळे बदलते राजकीय समीकरण! पुणेरी टाइम्स टीम(विश्लेषण…)

SHARE:

पुणेरी टाइम्स टीम... दौंड तालुक्यातील राजकीय वातावरणात गेल्या काही दिवसांपासून एक नवी हालचाल जाणवत आहे. “नव्या युगाची नवी उमेद, सदैव नव्या कल्पनांचा वेध — तुषारदादा” या ओळींनी सजलेले तुषार रमेश थोरात यांचे पोस्टर सोशल मीडियावर झळकताच, स्थानिक राजकीय चर्चेचा सूरच बदलला आहे. सामान्यतः पोस्टर म्हणजे राजकारणातील एक नियमित बाब. परंतु या पोस्टरने जो प्रतिसाद निर्माण केला — तो दौंडच्या राजकीय समीकरणात काहीतरी “नवे” घडत असल्याचे संकेत देतो.

तुषार थोरात हे नाव गेल्या काही काळापासून दौंड तालुक्यातील परिसरात नव्या आशेचा केंद्रबिंदू बनत आहे. त्यांनी कोणतेही मोठे राजकीय पद भूषवले नसले, तरी त्यांच्या नेतृत्वशैलीत एक वेगळा आत्मविश्वास आणि दृष्टीकोन दिसतो. संयमी, अभ्यासू, आणि संवादकुशल असे हे तरुण नेते स्थानिक राजकारणात इतर पद्धतींपेक्षा विचारपूर्वक आणि आधुनिक दृष्टिकोनातून काम करत आहेत. त्यांच्या सभोवती एक नव्या पिढीची कार्यकर्त्यांची फळी उभी राहत आहे, हेच त्यांच्या यशाचे खरे लक्षण आहे.

दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या काही काळात अंतर्गत मतभेद आणि संघटनात्मक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, तुषार थोरात यांच्या सक्रीयतेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. सोशल मीडियावरील त्यांची उपस्थिती, गावोगावी होणाऱ्या भेटीगाठी आणि तरुणांशी संवाद या माध्यमातून ते पक्षाच्या नव्या पिढीला प्रेरणा देत आहेत.

पक्षाच्या संघटनेत नव्या रक्ताचा ओघ सुरू झाल्याने राष्ट्रवादीला स्थानिक स्तरावर बळ मिळू लागल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला दौंड तालुक्यात नवसंजीवनी मिळणार? दौंड तालुक्यातील राजकारण पारंपरिक गटबाजी आहे आणि राजकारण जुन्या चेहऱ्यांभोवती फिरत आले आहे. मात्र तुषार थोरात यांच्या सह अनेक नवीन चेहरे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मैदानात उतरू पाहत आहेत. त्यामुळे पारंपरिक समीकरण बदलण्यासाठी हे युवकांचे राजकीय समीकरण पारंपरिक समीकरण बदलू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. तुषार थोरात यांच्या भोवती तयार होणारी युवा टीम, सोशल मीडिया व जनसंपर्कातील समाज, तसेच त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेमुळे विरोधी पक्षही सावध झाले आहेत. आजचा युवक केवळ घोषणांवर नाही, तर कृतीवर विश्वास ठेवतो. अशा वेळी तुषार थोरात यांच्यासारखे तरुण नेतृत्व युवकांच्या अपेक्षा समजून घेणारे आणि त्यांची दिशा ठरवणारे ठरू शकते, अशी भावना आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे. “राजकारण हे समाजकारणाचे पुढचे पाऊल आहे” हा त्यांचा दृष्टिकोन तरुणांना आपला वाटतोय. त्यामुळे पुढचा टप्पा — बदलत्या पिढीचे राजकारण असेल यात शंका नाही.

दौंड तालुक्यातील राजकारणात आता एका नव्या पिढीचे नेतृत्व उभे राहताना दिसतेय. हे नेतृत्व विचार, शिक्षण, आणि संवादावर आधारित आहे — नकारात्मक राजकारणापेक्षा जनसंपर्क आणि विकासाभिमुख भूमिकेवर भर देणारे आहे. तुषार थोरात यांच्या पुढाकारामुळे दौंड तालुक्यातील पारंपरिक राजकीय समीकरणांना नवे वळण मिळू शकते. दौडकरांचे लक्ष एका प्रश्नावर केंद्रित आहे —

“तुषार थोरात यांच्या नेतृत्वात दौंडच्या राजकारणात खरोखरच नवा अध्याय सुरू होतो आहे का?”या प्रश्नाचे उत्तर आगामी काळात निश्चितच स्पष्ट होईल, पण एवढे मात्र नक्की युवकांमध्ये जागलेली ही उमेद दौंडच्या राजकीय भविष्याला नवा आकार देण्यास समर्थ ठरू शकते.

Puneri Times
Author: Puneri Times

Leave a Comment

वाचनीय बातम्या