दौंड | प्रतिनिधी दौंड तालुक्यातील राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली असून दोन्ही पवार गटांसाठी निष्ठावंत राहिलेला तालुक्यातील बडा राजकीय नेता भाजपाच्या गोटात गेला आहे. या राजकीय डावाची दौंड तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या राजकीय उलथापालथीमागे दौंडचे “आमदार राहुल कुल” यांचा रणनीतिक डाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
आप्पासाहेब पवार यांनी सामाजिक, राजकीय संबंध जपत या नेत्याने गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांशी समतोल राखत तालुक्यात संघटन मजबूत केले होते. मात्र, राष्ट्रवादीतील फूट आणि बदलत्या राजकीय समीकरणांमुळे पवार अस्वस्थ असल्याचे संकेत काही दिवसांपासून मिळत होते. दरम्यान, भाजपकडील ही खुली ऑफर पवार यांच्या राजकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा असणार असल्याचे बोलले जात आहे, स्थानिक पातळीवर भाजप संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने आगामी राजकीय घडामोडी, दुरदृष्टी यासाठी ही खेळी आखली जात असल्याचे बोलले जात आहे. शेवटी निष्ठावांताला न्याय मिळालाच! पण तो भारतीय जनता पक्षाचे कडून असे काही जण व्यक्त झाले. मात्र यामागे आमदार राहुल कुल यांची सूक्ष्म पण प्रभावी रणनीती असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.



