Breaking News
दौंड पंचायत समितीचे सभापती ‘सुखदेव चोरमले’ ॲक्शन मोडवर; मनरेगा यंत्रणा सुतासारखी सरळ – रखडलेली कामं मार्गी लागणार! दौंड पंचायत समितीचे सभापती “सुखदेव चोरमले” ॲक्शन मोडवर! रोजगार हमी कक्षातील कामांचा धडाकेबाज आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या कडक सूचना… शिवरायांचा अवमान पडला महागात! CET सेलने मानली चूक, कारवाई अटळ- आमदार ‘राहुल कुल’ यांची माहिती… पुणे जिल्हा परिषद “अध्यक्षांच्या तालुक्यातच मनरेगाचा बोजवारा; शेतकऱ्यांची उघड पिळवणूक!” बदली म्हणजे पळवाट? भ्रष्ट अधिकारी सुरक्षित, शेतकरी उद्ध्वस्त! दोन वर्षे पैसे नाहीत, फाईल गायब – दौंड पंचायत समिती प्रशासनाचा काळा कारभार उघड! युवा पत्रकार “अक्षय देवडे” यांना ग्रामीण पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान…

खडकी–देऊळगाव राजे गटात अमर परदेशींची भूमिका ठरणार किंगमेकर? भाजप–राष्ट्रवादीचे गणित बिघडण्याची शक्यता…

SHARE:

पुणेरी टाइम्स टीम… दौंड  खडकी–देऊळगाव राजे जिल्हा परिषद गटात सध्या राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत असून, अमर परदेशी यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमर परदेशी हे मलठण गावच्या लोकनियुक्त सरपंच पारुबाई परदेशी यांचे सुपुत्र असून, आमदार राहुल कुल यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या हालचालींमुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे निवडणुकीचे गणित बिघडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

या गटातून भाजपाकडून आप्पासाहेब पवार तर राष्ट्रवादीकडून विरधवल जगदाळे हे उमेदवार रिंगणात आहेत. मात्र विशेष बाब म्हणजे हे दोन्ही उमेदवार गटाच्या बाहेरील असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे. पक्षीय ताकद जरी महत्त्वाची असली, तरी “भूमिपुत्र” आणि स्थानिक नेतृत्वाची भूमिका निवडणुकीत निर्णायक ठरणार, असे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.

दरम्यान, आप्पासाहेब पवार यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजप नेते वासुदेव काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय काळभोर तसेच त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर ऐकू येत आहे. ही नाराजी कोणाच्या पथ्यावर पडणार, तर कोणाची ‘विकेट’ घेणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क–वितर्कांना उधाण आले आहे.

अशा परिस्थितीत अमर परदेशी नेमकी कोणती भूमिका घेतात, स्थानिक मतदारांचा कल काय सांगतो, यावर या गटातील निवडणुकीचा निकाल मोठ्या अवलंबून राहणार आहे. त्यामुळे खडकी–देऊळगाव राजे गटाची लढत अधिक चुरशीची होत असून, आगामी काळात येथे राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

Puneri Times
Author: Puneri Times

Leave a Comment

वाचनीय बातम्या