Breaking News
दौंड पंचायत समितीचे सभापती ‘सुखदेव चोरमले’ ॲक्शन मोडवर; मनरेगा यंत्रणा सुतासारखी सरळ – रखडलेली कामं मार्गी लागणार! दौंड पंचायत समितीचे सभापती “सुखदेव चोरमले” ॲक्शन मोडवर! रोजगार हमी कक्षातील कामांचा धडाकेबाज आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या कडक सूचना… शिवरायांचा अवमान पडला महागात! CET सेलने मानली चूक, कारवाई अटळ- आमदार ‘राहुल कुल’ यांची माहिती… पुणे जिल्हा परिषद “अध्यक्षांच्या तालुक्यातच मनरेगाचा बोजवारा; शेतकऱ्यांची उघड पिळवणूक!” बदली म्हणजे पळवाट? भ्रष्ट अधिकारी सुरक्षित, शेतकरी उद्ध्वस्त! दोन वर्षे पैसे नाहीत, फाईल गायब – दौंड पंचायत समिती प्रशासनाचा काळा कारभार उघड! युवा पत्रकार “अक्षय देवडे” यांना ग्रामीण पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान…

दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा गावच्या शेतकरी कन्या “निकिता खराडेचे” स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश!

SHARE:

निकिता खराडे चे नेत्रदीपक यश...
निकिता खराडे

पुणेरी टाइम्स टीम – दौंड तालुक्यातील छोट्याशा हिंगणीगाडा गावची शेतकरी कन्या कु. निकिता संभाजी खराडे हिने आपल्या परिश्रमाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत ऐतिहासिक यश मिळवले आहे. हजारो विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा करीत निकिताने STI (State Tax Inspector) तसेच ASO (Assistant Section Officer – मंत्रालय, मुंबई) या दोन महत्त्वाच्या पदांसाठी पात्रता मिळवत राज्यात ५ वा क्रमांक पटकावला आहे. निकिता हिचा शैक्षणिक प्रवास गावातील जिल्हा परिषद शाळा, हिगणीगाडा येथून सुरू झाला. सातवीनंतर तिने पुढील शिक्षण शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, शारदानगर, बारामती येथे घेतले. त्यानंतर कृषी महाविद्यालय, पुणे (शिवाजीनगर) येथून तिने बी.एस्सी. (कृषी) ही पदवी पूर्ण केली.

MPSC सारख्या कठीण स्पर्धा परीक्षेसाठी निकिताने कोचिंग क्लासचा आधार न घेता स्व-अभ्यास (Self Study) या मार्गाचा स्वीकार केला. वाचनालयात सतत अभ्यास, कष्ट, ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवण्याची वृत्ती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हीच तिच्या यशाची खरी गुरुकिल्ली ठरली असून स्व-अभ्यास हेच यशाचे गमक आहे असे निकिताने यावेळी सांगितले. निकिताच्या या यशाने तिच्या कुटुंबाचा, हिंगणीगाडा गावाचा तसेच संपूर्ण दौंड तालुक्याचा अभिमान उंचावला आहे. ग्रामस्थ, शिक्षक, नातेवाईक व मित्रपरिवार यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला असून, “गावातील लेकरू आता मंत्रालयात सेवेस लागणार” या आनंदवार्तामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

Puneri Times
Author: Puneri Times

1 thought on “दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा गावच्या शेतकरी कन्या “निकिता खराडेचे” स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश!”

Leave a Comment

वाचनीय बातम्या