पुणेरी टाइम्स टीम…ग्रामविकास विभागाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा महाराष्ट्राचा निश्चित. या पार्श्वभूमीवर पाटस, ता. दौंड येथे कार्यक्रम स्थळाची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमस्थळाची पाहणी नुकतीच पार पडली.

या पाहणीदरम्यान आमदार राहुल दादा कुल, विभागीय आयुक्त श्री. चंद्रकांत फुलकुंडवार, पोलिस महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र) श्री. सुनील फुलारी, जिल्हाधिकारी पुणे श्री. जितेंद्र डुड्डी, पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे श्री. गजानन पाटील, अपर पोलीस अधीक्षक बारामती श्री. गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी पोलिस दौंड श्री. बापूराव दडस, पोलिस निरीक्षक श्री. नारायण देशमुख, श्री. गोपाळ पवार, प्रांताधिकारी श्री. रेवणनाथ लबडे, तहसीलदार श्री. अरुण शेलार, गटविकास अधिकारी श्री. अरुण मळभर तसेच विविध संबंधित विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.या पाहणीत सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, कार्यक्रमस्थळाची आखणी तसेच नागरिकांच्या सोयी-सुविधांचा सखोल आढावा घेण्यात आला.



