Breaking News
दौंड पंचायत समितीचे सभापती ‘सुखदेव चोरमले’ ॲक्शन मोडवर; मनरेगा यंत्रणा सुतासारखी सरळ – रखडलेली कामं मार्गी लागणार! दौंड पंचायत समितीचे सभापती “सुखदेव चोरमले” ॲक्शन मोडवर! रोजगार हमी कक्षातील कामांचा धडाकेबाज आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या कडक सूचना… शिवरायांचा अवमान पडला महागात! CET सेलने मानली चूक, कारवाई अटळ- आमदार ‘राहुल कुल’ यांची माहिती… पुणे जिल्हा परिषद “अध्यक्षांच्या तालुक्यातच मनरेगाचा बोजवारा; शेतकऱ्यांची उघड पिळवणूक!” बदली म्हणजे पळवाट? भ्रष्ट अधिकारी सुरक्षित, शेतकरी उद्ध्वस्त! दोन वर्षे पैसे नाहीत, फाईल गायब – दौंड पंचायत समिती प्रशासनाचा काळा कारभार उघड! युवा पत्रकार “अक्षय देवडे” यांना ग्रामीण पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान…

जनतेच्या मनातील ‘विठ्ठल’ भाजपचा उमेदवार…

SHARE:

पुणेरी टाइम्स टीम…पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी दौंड तालुक्यातील खडकी गण अनुसूचित जातीसाठी (SC) राखीव असून, या गणासाठी भारतीय जनता पार्टीकडून राजेगाव येथील श्री राजेश्वर विकास सेवा संस्थेचे माजी चेअरमन, पत्रकार व वकील विठ्ठल भाऊसाहेब मोघे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच खडकी गणासह संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विठ्ठल मोघे हे गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय असून, वकिलीच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांशी त्यांचा थेट संपर्क आहे. न्याय, प्रशासन व सामान्य नागरिक यांच्यातील दुवा म्हणून त्यांनी सातत्याने काम केले आहे. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक नाळ असलेल्या श्री राजेश्वर विकास सेवा संस्थेचे माजी चेअरमन म्हणून त्यांनी केलेले कार्य सर्वपरिचित असून, शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य घटकांमध्ये त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

विकासाभिमुख दृष्टिकोन, पारदर्शक कार्यपद्धती आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद साधणारे नेतृत्व म्हणून विठ्ठल मोघे यांची खडकी गणात मजबूत पकड आहे. त्यामुळे भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याने ‘जनतेच्या मनातील उमेदवार’ अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

खडकी गण हा आमदार राहुल कुल यांच्यासाठी नेहमीच महत्त्वाचा मानला गेलेला गण असून, या ठिकाणी अनुभवी, स्वच्छ प्रतिमा आणि मजबूत जनसंपर्क असलेल्या उमेदवाराला संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या निर्णयाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

उमेदवारी मिळाल्यानंतर विठ्ठल मोघे यांनी आमदार राहुल कुल व भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले. “पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करीन. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी प्राधान्याने काम करीन आणि खडकी गणाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीन,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

या उमेदवारीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, आगामी निवडणूक एकजुटीने आणि ताकदीने लढवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. खडकी गणात आता प्रत्यक्ष प्रचाराला वेग येणार असून, निवडणुकीच्या राजकीय हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Puneri Times
Author: Puneri Times

Leave a Comment

वाचनीय बातम्या