Breaking News
दौंड पंचायत समितीचे सभापती ‘सुखदेव चोरमले’ ॲक्शन मोडवर; मनरेगा यंत्रणा सुतासारखी सरळ – रखडलेली कामं मार्गी लागणार! दौंड पंचायत समितीचे सभापती “सुखदेव चोरमले” ॲक्शन मोडवर! रोजगार हमी कक्षातील कामांचा धडाकेबाज आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या कडक सूचना… शिवरायांचा अवमान पडला महागात! CET सेलने मानली चूक, कारवाई अटळ- आमदार ‘राहुल कुल’ यांची माहिती… पुणे जिल्हा परिषद “अध्यक्षांच्या तालुक्यातच मनरेगाचा बोजवारा; शेतकऱ्यांची उघड पिळवणूक!” बदली म्हणजे पळवाट? भ्रष्ट अधिकारी सुरक्षित, शेतकरी उद्ध्वस्त! दोन वर्षे पैसे नाहीत, फाईल गायब – दौंड पंचायत समिती प्रशासनाचा काळा कारभार उघड! युवा पत्रकार “अक्षय देवडे” यांना ग्रामीण पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान…

दौंडमध्ये ‘बंडखोर आणि अपक्ष’ उमेदवारांच्या लढाईत “दिग्गज” पराभवाच्या छायेत! खडकी- गटात राजकीय अस्तित्वाची लढाई तर बोरीपार्धी केडगाव गटात ‘टफ फाईट’ वाचा सविस्तर बातमी…

SHARE:

पुणेरी टाइम्स टीम…जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील राजकीय रंगभूमी पुन्हा एकदा तणावपूर्ण झाली आहे. पारंपारिक दिग्गज नेते आणि पक्षीय उमेदवारांच्या विरोधात बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांच्यामुळे दौंड तालुक्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणुकी दरम्यान दौंड तालुक्यात अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. बंडखोर व अपक्ष उमेदवारांनी त्यांच्या मतदार संघामध्ये आपली ताकद निर्माण केली आहे. अनेक मतदार या अपक्ष उमेदवारांशी जवळीक, सामाजिक कार्यात सहभाग नोंदवत आहेत. स्थानिक समस्या समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून उमेदवार प्रभावित झालेले आहेत. यामुळे, पारंपारिक पक्षांच्या, गटाच्या दिग्गज नेत्यांनासोबत उमेदवार यांनाही अपेक्षित विजयाची खात्री नसल्याची चिंता निर्माण झाली आहे.

अपक्ष, बंडखोर उमेदवारांचा हल्लाबोल ठराविक राजकीय घराणे व व्यक्तीशी दिसत आहे. विशेष म्हणजे काही बंडखोर उमेदवारांनी सर्वसामान्य मतदारांमध्ये आपले धैर्य आणि स्वतंत्र आवाज प्रभावीपणे सादर केले आहे. या उमेदवारांच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक पक्षीय नेते व उमेदवार त्यांच्या सुरक्षित जागांचा निकाल बदलणार आहेत. काही ठिकाणी तर पक्षीय उमेदवारांना अपक्ष/बंडखोर उमेदवारांच्या समर्थनामुळे मतांच्या वाटपात मोठा बदल दिसून येत आहे. त्यामुळे दिग्गज म्हणून ओळखले जाणारे राजकारणी यांचा ऐन रणधुमाळीत नाकात दम आला आहे.

विशेषतः दौंड तालुक्यातील काही दिग्गज नेते, ज्यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये सहज विजय मिळवला होता, तिथेच यावेळी अपक्ष उमेदवारांच्या उपस्थितीमुळे हे दिग्गज पराभवाच्या छायेत आढळत आहेत. मतदारांच्या अपेक्षा, स्थानिक समस्यांवरील दृष्टिकोन आणि अपक्ष उमेदवारांचा सक्रिय प्रचार यामुळे या नेत्यांच्या विजयाची निश्चिती धोक्यात आली आहे. दिग्गज नेत्यांच्या राजकारणावर याचा मोठा परिणाम होणार आहे. दौंड तालुक्यातील सध्याचे राजकीय वातावरण हे कठीण आणि अनिश्चित आहे. पारंपारिक नेते, पक्षीय उमेदवार आणि अपक्ष/बंडखोर उमेदवार यांच्या मध्ये निवडणूक निकाल पूर्णपणे अनपेक्षित ठरू शकतो. मतदारांच्या विचारसरणीमध्ये बदल, स्थानिक सामाजिक घडामोडी आणि अपक्ष उमेदवारांची लोकप्रियता या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे दौंडमध्ये बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांच्या लढाईत “दिग्गज” पराभवाच्या छायेत गेल्याचे संकेत दिसत आहेत.खडकी- गटात विरधवल जगदाळे आणि आप्पासाहेब पवार यांच्यात राजकीय अस्तित्वाची लढाई आहे तर बोरीपार्धी केडगाव गटात माजी आमदार रमेश थोरात यांचे सुपुत्र तुषार उर्फ गणेश थोरात व ‘आनंद थोरात यांचे सुपुत्र अभिषेक थोरात  यांच्यात ‘टफ फाईट’ पहायला मिळत आहे.

Puneri Times
Author: Puneri Times

Leave a Comment

वाचनीय बातम्या