Breaking News
दौंड पंचायत समितीचे सभापती ‘सुखदेव चोरमले’ ॲक्शन मोडवर; मनरेगा यंत्रणा सुतासारखी सरळ – रखडलेली कामं मार्गी लागणार! दौंड पंचायत समितीचे सभापती “सुखदेव चोरमले” ॲक्शन मोडवर! रोजगार हमी कक्षातील कामांचा धडाकेबाज आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या कडक सूचना… शिवरायांचा अवमान पडला महागात! CET सेलने मानली चूक, कारवाई अटळ- आमदार ‘राहुल कुल’ यांची माहिती… पुणे जिल्हा परिषद “अध्यक्षांच्या तालुक्यातच मनरेगाचा बोजवारा; शेतकऱ्यांची उघड पिळवणूक!” बदली म्हणजे पळवाट? भ्रष्ट अधिकारी सुरक्षित, शेतकरी उद्ध्वस्त! दोन वर्षे पैसे नाहीत, फाईल गायब – दौंड पंचायत समिती प्रशासनाचा काळा कारभार उघड! युवा पत्रकार “अक्षय देवडे” यांना ग्रामीण पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान…

मलठण रस्ता घोटाळा उघड! अपूर्ण काम, निकृष्ट दर्जा — अधिकारी-ठेकेदार संगनमताचा संशय! ठेकेदारावर कारवाई कधी?

SHARE:

मलठणमध्ये अपूर्ण व निकृष्ट रस्ता; काम ठप्प, ग्रामस्थ-विद्यार्थ्यांचे हाल!
पुणेरी टाइम्स टीम… मलठण (ता. दौंड) येथे सुरू असलेले काँक्रीट रस्त्याचे काम पूर्णपणे रखडले असून, अनेक दिवसांपासून काम बंद अवस्थेत आहे. अपूर्ण कामामुळे ग्रामस्थांसह शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याने ठिकठिकाणी खड्डे, उखडलेले काँक्रीट आणि राडारोडाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या कामाचा दर्जाही अत्यंत निकृष्ट आहे. वापरलेले साहित्य कमी प्रतीचे असून, रस्ता पूर्ण होण्याआधीच खराब होण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
दरम्यान, इतक्या गंभीर परिस्थितीतही संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही, तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
अपूर्ण काम तात्काळ सुरू करून गुणवत्तापूर्ण रस्ता पूर्ण करावा, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे. मलठण मधील नागरिक आता प्रशासनाच्या ठोस भूमिकेची वाट पाहत आहेत.

Puneri Times
Author: Puneri Times

Leave a Comment

वाचनीय बातम्या