Breaking News
दौंड पंचायत समितीचे सभापती ‘सुखदेव चोरमले’ ॲक्शन मोडवर; मनरेगा यंत्रणा सुतासारखी सरळ – रखडलेली कामं मार्गी लागणार! दौंड पंचायत समितीचे सभापती “सुखदेव चोरमले” ॲक्शन मोडवर! रोजगार हमी कक्षातील कामांचा धडाकेबाज आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या कडक सूचना… शिवरायांचा अवमान पडला महागात! CET सेलने मानली चूक, कारवाई अटळ- आमदार ‘राहुल कुल’ यांची माहिती… पुणे जिल्हा परिषद “अध्यक्षांच्या तालुक्यातच मनरेगाचा बोजवारा; शेतकऱ्यांची उघड पिळवणूक!” बदली म्हणजे पळवाट? भ्रष्ट अधिकारी सुरक्षित, शेतकरी उद्ध्वस्त! दोन वर्षे पैसे नाहीत, फाईल गायब – दौंड पंचायत समिती प्रशासनाचा काळा कारभार उघड! युवा पत्रकार “अक्षय देवडे” यांना ग्रामीण पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान…

‘अमरसिंह परदेशी’ यांची जनसंपर्क आणि मोर्चेबांधणी मोहीम — दौंडच्या राजकारणात नवा चेहरा चर्चेत!

SHARE:

पुणेरी टाइम्स टीम..दौंड तालुक्याच्या पूर्व भागात सध्या राजकीय समीकरणांमध्ये नव्या हालचालींना सुरुवात झाली आहे. या भागात युवा नेतृत्व म्हणून “अमरसिंह परदेशी” हे नाव वेगाने पुढे येत असून, त्यांच्या जनसंपर्क मोहिमा आणि संघटनबांधणीमुळे अनेक जुन्या राजकीय दिग्गजांच्या कपाळावर आठ्या उमटल्या आहेत.

पवार, काळे, जगदाळे आणि काळभोर यांसारख्या अनुभवी नेत्यांच्या कार्यक्षेत्रात परदेशी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे नवीन समीकरणे तयार होताना दिसत आहेत. विशेषतः खडकी, स्वामी चिंचोली, मलठण, लोणारवाडी, काळेवाडी, राजेगाव, वाटलुज, आलेगाव आणि खोरवडी या गावांमध्ये परदेशी यांचा प्रभाव वाढत असून, स्थानिक पातळीवर त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या कार्यशैलीतून लोकसंपर्क आणि संघटन कौशल्याची झलक दिसत आहे. दौंडच्या पूर्व भागात महिला मतदारांचा कौल यावेळी निर्णायक ठरण्याची शक्यता असून, परदेशी यांनी या मतदार वर्गाशी थेट संपर्क साधण्यासाठी विशेष मोहिमा सुरू केल्या आहेत. गावागावातील महिलांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचे आणि विकासाचे आश्वासन देण्याचे काम त्यांनी हातात घेतले आहे.

राजकीय निरीक्षकांच्या मते, सध्याच्या स्थितीत मतदार नवीन चेहऱ्याला संधी देण्याच्या विचारात आहेत. अशा वेळी परदेशी यांची संयमी, जनसंपर्ककेंद्रित भूमिका आणि स्थानिकांशी असलेली जवळीक त्यांना आगामी निवडणुकांत “डार्क हॉर्स” बनवू शकते. दौंडच्या पूर्व भागात येत्या काही महिन्यांत राजकीय समीकरणे कशी बदलतात, आणि परदेशी यांचे नाव प्रत्यक्ष निवडणूक रंगमंचावर कितपत प्रभाव टाकते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Puneri Times
Author: Puneri Times

Leave a Comment

वाचनीय बातम्या