दौंड | प्रतिनिधी : पंचायत समिती दौंड २०२६ निवडणुकीत कुरकुंभ गणातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राहुल शितोळे यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना स्पष्टपणे दिसून येत आहे. गावोगावी त्यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाढते जनसमर्थन हे येणाऱ्या निवडणुकीतील चित्र बदलणारे ठरण्याची शक्यता आहे.
शब्दात ताकद, विचारात स्पष्टता आणि जनतेशी थेट संवाद — या त्रिसूत्रीमुळे राहुल शितोळे यांनी अल्पावधीतच जनतेच्या मनात विश्वासाचं स्थान निर्माण केलं आहे. “अपक्ष असूनही ठाम नेतृत्व, निर्भीड भूमिका आणि जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक पाठपुरावा” निष्ठावंत यामुळे त्यांची वेगळी ओळख आहे. राजकीय पक्षांच्या चौकटीबाहेर जाऊन थेट जनतेच्या मुद्द्यांवर लढणारा कार्यकर्ता ते नेता म्हणून राहुल शितोळे कडे पाहिलं जात आहे. त्यामुळेच अनेक गावांतून कार्यकर्ते, तरुण, शेतकरी आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे चित्र आहे.
स्थानिक विकास, मूलभूत सुविधा, शेतकरी प्रश्न, तरुणांचे प्रश्न आणि पारदर्शक कारभार या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेतल्यामुळे “हा आपलाच माणूस” अशी भावना मतदारांमध्ये निर्माण होत आहे. राजकीय जाणकारांच्या मते, राहुल शितोळे यांचा वाढता प्रभाव आणि मिळणारा व्यापक पाठींबा पाहता, या गणातील निवडणूक अधिकच रंगतदार होणार असून, पारंपरिक राजकीय गणिते बदलण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.



