पुणेरी टाइम्स टीम दौंड… राजेगाव येथील सुपुत्र “विठ्ठल मोघे” सध्या खडकी पंचायत समिती गणातून निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून ‘विठ्ठल मोघे’ यांना मतदारांकडून मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने खडकी गणात विजयाची नांदी वाजू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
“विठ्ठल मोघे” हे आमदार ‘राहुल कुल’ यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. आमदार ‘राहुल कुल’ यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास, भाजपची विकासाभिमुख धोरणे आणि स्थानिक प्रश्नांची सखोल जाण यामुळे मोघेंच्या प्रचाराला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
खडकी गणातील गावोगावी प्रचार दौरे, बैठका आणि जनसंवादातून मोघेंनी थेट मतदारांशी संवाद साधला आहे. या प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांचा उत्साह, नागरिकांची उपस्थिती आणि मिळणारा पाठिंबा पाहता ‘मोघेंच्या’ पारड्यात मताधिक्य वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडकी पंचायत समिती गणातील राजकीय वातावरण तापले असून राजेगावचे युवा नेतृत्व, खडकी पंचायत गणातील भाजपाचे उमेदवार ॲड. ‘विठ्ठल मोघे’ विजयाच्या दिशेने ठाम पावले टाकत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.



