Breaking News
दौंड पंचायत समितीचे सभापती ‘सुखदेव चोरमले’ ॲक्शन मोडवर; मनरेगा यंत्रणा सुतासारखी सरळ – रखडलेली कामं मार्गी लागणार! दौंड पंचायत समितीचे सभापती “सुखदेव चोरमले” ॲक्शन मोडवर! रोजगार हमी कक्षातील कामांचा धडाकेबाज आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या कडक सूचना… शिवरायांचा अवमान पडला महागात! CET सेलने मानली चूक, कारवाई अटळ- आमदार ‘राहुल कुल’ यांची माहिती… पुणे जिल्हा परिषद “अध्यक्षांच्या तालुक्यातच मनरेगाचा बोजवारा; शेतकऱ्यांची उघड पिळवणूक!” बदली म्हणजे पळवाट? भ्रष्ट अधिकारी सुरक्षित, शेतकरी उद्ध्वस्त! दोन वर्षे पैसे नाहीत, फाईल गायब – दौंड पंचायत समिती प्रशासनाचा काळा कारभार उघड! युवा पत्रकार “अक्षय देवडे” यांना ग्रामीण पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान…

राजेगावच्या “विठ्ठलाची” विजयाच्या दिशेने ठाम पावले; खडकी पंचायत समिती गणात विजयाची नांदी…!

SHARE:

पुणेरी टाइम्स टीम दौंड… राजेगाव येथील सुपुत्र “विठ्ठल मोघे” सध्या खडकी पंचायत समिती गणातून निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून ‘विठ्ठल मोघे’ यांना मतदारांकडून मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने खडकी गणात विजयाची नांदी वाजू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

“विठ्ठल मोघे” हे आमदार ‘राहुल कुल’ यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. आमदार ‘राहुल कुल’ यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास, भाजपची विकासाभिमुख धोरणे आणि स्थानिक प्रश्नांची सखोल जाण यामुळे मोघेंच्या प्रचाराला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

खडकी गणातील गावोगावी प्रचार दौरे, बैठका आणि जनसंवादातून मोघेंनी थेट मतदारांशी संवाद साधला आहे. या प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांचा उत्साह, नागरिकांची उपस्थिती आणि मिळणारा पाठिंबा पाहता ‘मोघेंच्या’ पारड्यात मताधिक्य वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडकी पंचायत समिती गणातील राजकीय वातावरण तापले असून राजेगावचे युवा नेतृत्व, खडकी पंचायत गणातील भाजपाचे उमेदवार ॲड. ‘विठ्ठल मोघे’ विजयाच्या दिशेने ठाम पावले टाकत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

Puneri Times
Author: Puneri Times

Leave a Comment

वाचनीय बातम्या